Saturday, 23 February 2013



गर्भाळलेल्या ढगांतून
रिमझिम बरसणारा पाऊस,
वाराही चिंब चिंब गार ....
डोक्यावर घेऊन
काळ्या सावळ्या आभाळाची
फाटकी चादर
निघालोय प्रवासाला पुन्हा एकदा...

भुईवर कोसळणाऱ्या पाउसधारा...
आणि अंगाला लगटनारा गार वारा
आठवणींचा झालाय चुरा,
आणि जाणिवा सगळ्याच
उद्वस्त ...विखुरलेल्या...

गोल गोल फिरतोय आपण
स्वतः भोवतीच
वादळाशी झगडत,
पावसाशी लढत ...
काटेरी वाट चालत
निघालोय प्रवासाला पुन्हा एकदा...

आठवणींचा गुंता सोडत
गतकाळाशी बांधलेली नाळ कापत
सगळे बंध तोडत
चालत राहायचं ....
फक्त चालत राहायचं

हातात घेऊन हात ...
हा पाऊस, ते वादळ ...
कोणीही रोखू शकत नाहीये आपला प्रवास
भविष्याकडे...
कोणीही विसरू शकत नाही
एकमेकांशिवाय आपण आहोत अपूर्ण ...

 ---सोनाली घुले/देशमुख
Photo courtesy : Aparna Bhandar.

No comments:

Post a Comment