Tuesday, 11 December 2012


जीर्ण झालेल्या पुस्तकाची
पिवळी पानं उलटताना,
सापडलं मला नाजूक नजाकतीच,
जाळीदार एक पिंपळपान,
जपून ठेवला होतं,
सतरंगी मोरपीस छान...
असतील का असेच
मनाच्या कोपऱ्यात,
जाळीदार नक्षीचे, सतरंगी हळवे,
साठवलेले सोनेरी क्षण?
जरा मनात डोकावले,
जरा भूतकाळात विसावले,
नाचत होते थुईथुई मनात एक कारंजे,
उडत होते रंगबेरंगी तुषार एकेका क्षणांचे,
कोपऱ्यात मात्र दिसली एक ज्योत
मंद तेजाची,मनभर प्रकाशलेली....
 ----- सोनाली घुले/देशमुख
5/12/2012

Monday, 5 November 2012

तळहातांवरच्या रेषा न्याहाळताना
मला बघून ती म्हणाली,
'आयुष्य असतं बर का या रेघांसारख,
जशी नक्षी जाळीदार कधी
तर कधी असते आयुष्य म्हणजे
फक्त गुंतागुंत अगदी रेघां बरहुकूम....'
मग जराशी हसून
थोडी पुढे झुकून
म्हणाली मला,
'अगं पण आयुष्यही बदलत असतं,
त्या रेघांसारखं, बघता बघता
नक्षीदार जाळीला पडतात भोकं,
आणि नकळत सुटून जातो
किचकट गुंता....'
अलगद माझा हात धरला
तिच्या त्या आश्वासक स्पर्शाने
जीव माझा जरा सुखावला
' पण बाळे, एक लक्षात ठेव ,
तळ हातांवरच्या रेषा प्रमाणे
आयुष्य असेल जरी
तरी मनगट आहे ना आपले,
कधीही न बदलणारे,
आयुष्यातल्या नक्षीला सांभाळणारे
आणि झालाच कधी गुंता तर
जिकरीन सोडवणारे....
विश्वास ठेव तुझ्या मनगटावर
अन नको,त्या तळहातांवरच्या रेघांवर....'
4/11/2012

Saturday, 20 October 2012

क्षण चार हे प्रीतीचे
दोन शब्दांचे
दोन स्पर्शांचे !
 क्षण चार हे प्रीतीचे
तरीही मागे उरणारे ...

काही पहिल्या भेटीतले,
काही ओळखीत हसण्याचे
काही न बघताही रुसण्याचे
काही बावरलेले, हरवलेल्या
भिरभिरणाऱ्या नजरेचे

काही गहिर्या मैत्रीतले
काही मैत्री पलीकडल्या नात्यातले
काही हट्टी ,लडिवाळ
काही निग्रही,अहंकाराचे

काही भटकलेले, भरकटलेले
काही आसुसलेले मिलन स्वप्नात न्हालेले
काही हवेहवेसे सहवासातले...

काही आशंकेने भ्यालेले
आश्वासनांचे ,धीराचे
काही एकमेकांवरच्या विश्वासाचे

काही भांडणाचे ,
समेटाच्या आनंदाचे
उबदार मिठीतले
ओठातल्या साखर चवीचे

उरलेले सारेच
बेधुंद बेभान दोघांचे

तू गेल्यावर ...
तू गेल्यावरचा क्षण
एकच विरहाचा
असह्य न संपणाऱ्या
वेदनेचा.....
एकच क्षण उरलेल्या
     संपूर्ण आयुष्यभराचा...............

Wednesday, 10 October 2012

निलं सावळ आकाश
खाली हिरवी हिरवी धरती
सोन-पिवळा प्रकाश
पसरलाय क्षितिजावरती
वारा झुळूमुलू झुळूमुलू
गारवा शीतल मंजुळ
पानांची तालासुरात सळसळ
रंगांची फुलाफुलात उधळण
जोडीला परिमल सुखद मोहक
चैतन्य.... जीवन....
इच्छा ....अन उभारी.....
विश्वास.... अन गगन भरारी.....
याच साठी केला अट्टाहास
घेत राहिले
मनाविरुद्ध श्वास....
 ----- सोनाली घुले/देशमुख
       खूप खूप वर्षानपूर्वी!
 
मुद्दतसे आज एकबार फिरसे
अपनेही से रूबरू मै हुआ,
गिलो-शिकवोंका सिलसिला हुआ शुरू
एकबार फिरसे....
मन तोह बावरा कई बाते सुनाता रहा
एक बार फिरसे,
मै उसे अनसुनी करता रहा
एक बार फिरसे....
गैरोंसे नजदिकिया बढ़ाते रहे हम
एकबार फिरसे,
और अपनेही दरमियाँ फासले बनाते रहे
फिरसे...
हम रूबरू हुए है मनसे,
आज एक बार फिरसे ........

-------सोनाली घुले/देशमुख
                10/10/2012
ज़िन्दगी !
तू मुझे यूँ बहलाने की कोशिश मत कर
ये वर्षों के खिलौने बहुत नाजुक हैं
जिसे भी हाथ लगाऊँ
टुकड़ों में बिखर जाता है।
अब इन मुँह चिढ़ाते टुकड़ों को
उम्र कैसे कह दूँ मैं
सखी, कोई तो टुकड़ा
वक़्त के पाँव में चुभ कर
फ़र्श को लाल कर दे !
------पाश

Friday, 5 October 2012

निशान

मन के अन्दर द्वन्द चला जो सदियोंसे...
मन अपनेही से लड़ता झगड़ता सदियोंसे.....
बोलो तुम ही कौन जीता कौन हारा....
मन जीता तो मै हारा, मै जीता तो मै ही हारा......
सदियोंसे.......
सदियोंसे ही चला आ रहा
अटल यह युध्द है
मन अपना भी जिंदा है
इसी का तो यह निशान है


 सोनाली घुले/देशमुख

05/10/2012

Saturday, 25 August 2012


.... मी वणवा,  मीच वारा
मी आग  ,  धूरही मीच
उंच ज्वाला मी ...
मी राख ....मी राख !
त्या राखेतून जन्मनारा
फिनिक्सही मीच ..फिनिक्सही मीच !