Tuesday, 11 December 2012


जीर्ण झालेल्या पुस्तकाची
पिवळी पानं उलटताना,
सापडलं मला नाजूक नजाकतीच,
जाळीदार एक पिंपळपान,
जपून ठेवला होतं,
सतरंगी मोरपीस छान...
असतील का असेच
मनाच्या कोपऱ्यात,
जाळीदार नक्षीचे, सतरंगी हळवे,
साठवलेले सोनेरी क्षण?
जरा मनात डोकावले,
जरा भूतकाळात विसावले,
नाचत होते थुईथुई मनात एक कारंजे,
उडत होते रंगबेरंगी तुषार एकेका क्षणांचे,
कोपऱ्यात मात्र दिसली एक ज्योत
मंद तेजाची,मनभर प्रकाशलेली....
 ----- सोनाली घुले/देशमुख
5/12/2012