Wednesday, 27 February 2013
वर्तमान - काळाचा तुकडा छोटासा
पानावरचं दवबिंदू जसा
जसं झाडावरचं फुल,
वर्तमान ,क्षण भराचा काळ,
क्षणात होणारा ..भूतकाळ !
वर्तमान आहे
एक अपराजित सत्य,
आणि परिवर्तनीय असत्य
एक शब्द अर्थहीन
तरीही, गर्भात अंतरीक्ष!!
वर्तमान आहे चंद्र तारे,
आहे ब्रम्हांड सारे
सागरावरती वाहणारे वारे
बाकी सगळाच फक्त आभास
वर्तमान आहे क्षणिक सुख
आणि शाश्वत दुखः
जीवन आहे वर्तमान
भविष्यात जगण्यासाठी !!!
सोनाली घुले-देशमुख
२६/०२/२०१३
Saturday, 23 February 2013
गर्भाळलेल्या ढगांतून
रिमझिम बरसणारा पाऊस,
वाराही चिंब चिंब गार ....
डोक्यावर घेऊन
काळ्या सावळ्या आभाळाची
फाटकी चादर
निघालोय प्रवासाला पुन्हा एकदा...
भुईवर कोसळणाऱ्या पाउसधारा...
आणि अंगाला लगटनारा गार वारा
आठवणींचा झालाय चुरा,
आणि जाणिवा सगळ्याच
उद्वस्त ...विखुरलेल्या...
गोल गोल फिरतोय आपण
स्वतः भोवतीच
वादळाशी झगडत,
पावसाशी लढत ...
काटेरी वाट चालत
निघालोय प्रवासाला पुन्हा एकदा...
आठवणींचा गुंता सोडत
गतकाळाशी बांधलेली नाळ कापत
सगळे बंध तोडत
चालत राहायचं ....
फक्त चालत राहायचं
हातात घेऊन हात ...
हा पाऊस, ते वादळ ...
कोणीही रोखू शकत नाहीये आपला प्रवास
भविष्याकडे...
कोणीही विसरू शकत नाही
एकमेकांशिवाय आपण आहोत अपूर्ण ...
---सोनाली घुले/देशमुख
Photo courtesy : Aparna Bhandar.
Friday, 22 February 2013
जर तू राहिलीस अशीच निशब्द -
मी भरून टाकेन काठोकाठ ,
तुझ्या त्या शांततेनं अन जपेन त्याला जीवापाड
मी असेन स्तब्ध आणि वाट पाहिल त्या
चांदण्या रात्रीसारखी , जिन झुकवलय
आपलं मस्तक संयमानं.
सकाळ नक्कीच होईल ,
काळोख नाहीसा होईल अन
अवकाशातून झेपावणाऱ्या
सोनेरी प्रवाहांमध्ये
तुझा आवाज मिसळला जाईल ......
-- Anamik
गुरुदेवांच्या कवितेचे स्वैर भाषांतर
original poem by Tagore :
Patience
If thou speakest not I will fill my heart with thy silence and endure it.
I will keep still and wait like the night with starry vigil
and its head bent low with patience.
The morning will surely come, the darkness will vanish,
and thy voice pour down in golden streams breaking through the sky.
Then thy words will take wing in songs from every one of my birds' nests,
and thy melodies will break forth in flowers in all my forest groves.

Thursday, 21 February 2013
वर्षानुवर्ष सतावणाऱ्या प्रश्नांची
उत्तरं शोधताना ,
निष्पाप मुखवटया खाली
हरवलेय मी दगाबाज चक्रव्युहात
कित्येकदा जागवलय मला
माझ्याच शब्दांनी
रात्र रात्र , केलय मला
अस्वस्थ ,हैराण.
माझ्या अशाश्वत इच्छा
कधीही न संपणाऱ्या,
संपूर्ण बुडून गेलीये त्यात
माझं आयुष्य घालवलंय मी
आणि संपवलंय स्वतःला ....
चांदण्या रात्री एका,
मागितली माफी आणि
झोकून दिलं स्वतःला
आयुष्याच्या हातात
पुन्हा जगण्यासाठी...
सोनाली घुले
२०/०२/२०१३
Wednesday, 20 February 2013
क्षण
क्षण
निरनिराळ्या ढगांनी
ठेवलाय किरमिजी मुकुट
डोंगर शिखरात ....
सूर्यही वादळी वितळतोय
रंग भरल्या आभाळात...
का तुझी नजर अशी विसावलीये,
माझ्यावर...
का विसरलायस श्वास घ्यायला..
असा कधी होत नाही
जसं युगानयुगे झालेलं नाहीये ....
हा एक क्षण निसटून जाईल ...
तू तुझ्या नजरेत पुन्हा आकाश समावशील,
श्वास हि तुझा लयात येईल,
जसा युगानयुगे कधी,
थांबलाच नाही,
सूर्यही मग क्षितिजात विसावेल
आभाळ पुन्हा काळे सावळे बनून राहील
युगानयुगे हे असेच होतेय ...
हे असेच होणार आहे...
सोनाली घुले
१९/०२/२०१३
original
A Moment
The clouds had made a crimson crown
Above the mountains high.
The stormy sun was going down
In a stormy sky.
Why did you let your eyes so rest on me,
And hold your breath between?
In all the ages this can never be
As if it had not been.
Mary Elizabeth Coleridge
Thursday, 7 February 2013
दिवसेंदिवस तू मला लायक बनवतोय
त्या साध्या पण भव्य गोष्टींसाठी
ज्या तू मला दिल्यात न मागता -
हे आकाश, हा प्रकाश ,
हे तन , आणि हे मन!
वाचवलयस मला असंख्य
मोहांच्या धोक्यापासून !
अनेकदा असं झालय -
जेव्हा मी भटकलेय वेड्यासारखी.
अनेकदा उठ्लेय अन केलीये धावाधाव
माझ्या 'मोहां'च्या शोधात.
पण अशावेळी निष्ठुरपणे तू
दडवलयस स्वतःला माझ्यापासून!
तू नाकारतोयस मला सर्वकाही , सर्वकाळ
(जणू) रक्षण करतोस माझं
त्या क्षुद्र अन अशाश्वत इच्छांपासून.
दिवसेंदिवस तू बनतो आहेस मला लायक -
तुझ्या अस्तित्वाच्या पूर्ण पूर्ण स्वीकारासाठी!!
---Anamik
गुरुदेवांच्या कवितेचे स्वैर भाषांतर
original poem by Tagore :
Strong Mercy
My desires are many and my cry is pitiful,
but ever didst thou save me by hard refusals;
and this strong mercy has been wrought into my life through and through.
Day by day thou art making me worthy of the simple,
great gifts that thou gavest to me unasked---this sky and the light, this body and the
life and the mind---saving me from perils of overmuch desire.
There are times when I languidly linger
and times when I awaken and hurry in search of my goal;
but cruelly thou hidest thyself from before me.
Day by day thou art making me worthy of thy full acceptance by
refusing me ever and anon, saving me from perils of weak, uncertain desire.

Subscribe to:
Posts (Atom)