Wednesday, 12 November 2014

आपण नजरेची चौकट बनवतो आपापल्या अहंकाराच्या कुवती नुसार आणि प्रयत्न करतो त्या चौकटीतुन जग बघायचा!!! मग आभाळ दिसतं फाटक्या कागदाच्या तुकड्या सारखा आणि समुद्र भासतो एखाद्या डबक्या सारखा! आपल्या भोवतालची माणसही मावत नाहीत त्याच्यात मग हळू हळू आपण त्यांनाही लहान करत जातो चौकटीत बसवण्यासाठी आणि मग आपल्या अहंकारा नुसार आपण मात्र मोठे होत जातो .... त्या चौकटीत न मावण्या इतके!!!
    12/11/2014

No comments:

Post a Comment