Monday, 5 November 2012

तळहातांवरच्या रेषा न्याहाळताना
मला बघून ती म्हणाली,
'आयुष्य असतं बर का या रेघांसारख,
जशी नक्षी जाळीदार कधी
तर कधी असते आयुष्य म्हणजे
फक्त गुंतागुंत अगदी रेघां बरहुकूम....'
मग जराशी हसून
थोडी पुढे झुकून
म्हणाली मला,
'अगं पण आयुष्यही बदलत असतं,
त्या रेघांसारखं, बघता बघता
नक्षीदार जाळीला पडतात भोकं,
आणि नकळत सुटून जातो
किचकट गुंता....'
अलगद माझा हात धरला
तिच्या त्या आश्वासक स्पर्शाने
जीव माझा जरा सुखावला
' पण बाळे, एक लक्षात ठेव ,
तळ हातांवरच्या रेषा प्रमाणे
आयुष्य असेल जरी
तरी मनगट आहे ना आपले,
कधीही न बदलणारे,
आयुष्यातल्या नक्षीला सांभाळणारे
आणि झालाच कधी गुंता तर
जिकरीन सोडवणारे....
विश्वास ठेव तुझ्या मनगटावर
अन नको,त्या तळहातांवरच्या रेघांवर....'
4/11/2012

No comments:

Post a Comment